MUMBAI INDIANS REMAINING MATCHES, DATE, VENUE REVEALED
मुंबई इंडियन्सने पहिल्या सहा सामन्यांत वारंवार पराभवाची चव चाखल्यानंतर इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. पण, मागील सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली आणि त्यांचा प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ आठवडाभरासाठी स्थगित करावी लागली होती. त्याचे नवीन वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. त्यात मुंबई इंडियन्सचे सामने कुठे, केव्हा खेळवले जातील हे पाहूयात...