RR vs CSK Live Match Marathi Update: नितीश राणाने आज मैदान गाजवताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. आर अश्विनला त्याने टार्गेट करताना पहिल्याच षटकात १९ धावा कुटल्या. पण, राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाला अश्विनने तितक्याच चतुराईने बाद केले आणि महेंद्रसिंग धोनीची यष्टिंमागील कमाल पुन्हा पाहायला मिळाली.