
Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: सलग पाच सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला प्ले ऑफची जागा पक्की करण्यासाठी आणखी जोर लावावा लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांना टक्कर देणारे स्पर्धक आहेत आणि त्यासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा आजचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. RR तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे आणि तेही प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाद आहेत. पण, ते MI चे गणित बिघडवू शकतात.