RR vs RCB Live: १२ चेंडूंत ५२ धावा! यशस्वी जैस्वालने मैदान गाजवले, मिळाली नाही साथ; विराटने सोपा झेल सोडला... रापत बसला

IPL 2025 RR vs RCB Live: आयपीएल २०२५ मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुूरू सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार खेळी केली. त्याने १० चौकार व २ षटकारांसह ७५ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही.
IPL 2025 RR vs RCB Live:
IPL 2025 RR vs RCB Live: esakal
Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Update:

यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्सचा भार आजही आपल्या खांद्यावर सक्षमपणे उचलला. संजू सॅमसनसोबत त्याने चांगली सुरूवात केली होती, पंरतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले होते. त्यामुळे RR ला अपेक्षित रन रेटने धावा कुटता आल्या नाही. संजू मोठी खेळण्यापासून वंचित राहिला. यशस्वीने अर्धशतक झळकावल्यानंतर गिअर बदलला होता, पंरतु जोश हेझलवूडने त्याला माघारी पाठवले. RCB च्या खेळाडूंकडून काही सोपे झेलही टाकले गेले आणि त्यातला एक हलवा झेल विराटच्या हातून निसटला. यशस्वीने दमदार खेळ करूनही सहकाऱ्यांकडून साथ न मिळाल्याने RR ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com