रविवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांवर आणि खेळाडूंवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे ही कारवाई करण्यात आली असून, कर्णधारांसह दोन्ही संघांतील खेळाडूंवर दंड ठोठावण्यात आला आहे.