

गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात निराशेला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अवघ्या दोन गुणांसह त्यांचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. या पार्श्वभूमीवर आता पॅट कमिन्सच्या हैदराबाद संघासमोर फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचे आव्हान असणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमातील सुरुवात शानदार केली होती. सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना २८६ धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर मात्र सलग चार लढतींमध्ये त्यांना अनुक्रमे १९०, १६३, १२०, १५२ धावाच करता आल्या आहेत.