

Sunrisers Hyderabad Team Analysis IPL 2025: इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ वा हंगाम ५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतामध्ये आता आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. सोशल मीडियावर वातावरण निर्मिती केली जात आहे. अशात मित्रांच्या ग्रुप्समध्ये संघाची, खेळाडूंची व प्लेईंग इलेव्हनची चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. अशात सनरायझर्स हैद्राबाद संघाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यामागचं कारण आहे, टीम मॅनेजमेंटने केलेली खेळाडूंची निवड, संभाव्य प्लेईंग इलेव्हन आणि सर्वच क्षेत्रांमध्ये मजबूत दिसणारा संघ. पण SRH संघ यावेळी इतका का मजबूत वाटतो, मॅनेजमेंटने मागच्या हंगामातील कोणत्या चुका सुधारल्या सविस्तर जाणून घेऊयात.