IPL 2025 resumes with RCB vs KKR clash in Bengaluru : भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावरणानंतर आजपासून पुन्हा एकदा आयपीएलची रंगत पाहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये साखळी फेरीची लढत शनिवारी बंगळूरमध्ये पार पडणार आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीकडे याप्रसंगी लक्ष असणार आहे.