Sheikh Rashid Youngest CSK Opener IPL 2025 : सोमवारी लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईकडून शेख रशिदने आयपीएल पदार्पण करत सर्वात तरुण सलामीवीर होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अवघ्या २० व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. यापूर्वी हा विक्रम सॅम करणच्या नावे होते. या सामन्यात शेख रशिदने चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.