Bhuvneshwar Kumar’s Injury Status Ahead of CSK vs RCB : आज आयपीएल 2025 च्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना जिंकला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे, तर आरसीबीने कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) धूळ चारली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा वेळी विजयी लय कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.