Cute off-field moment between Kohli and Zaheer : मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरूसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजय मिळवत गुणतक्त्यात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवण्याचा बंगळुरु प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे, लखनौ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, परंतु हा सामना जिंकून हंगामाचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.