गुजरातचा विजयरथ मुंबई रोखणार? अहमदाबादमध्ये आज लढत; सूर्यकुमार यादव, तिलक वर्माच्या फलंदाजी फॉर्मची चिंता, कशी असेल Playing XI

Gujarat Titans vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अहमदाबादमधील सामन्यात कोण जिंकणार? शुभमन गिल, जॉस बटलरच्या फॉर्मचा प्रभाव, सूर्यकुमार यादव व तिलक वर्माची चिंता, तसेच गोलंदाजी विभागाची तयारी यांचा सामना निर्णायक ठरणार आहे.
Gujarat Titans vs Mumbai Indians

Gujarat Titans vs Mumbai Indians

sakal

Updated on

अहमदाबाद : मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना आज (ता. २०) अहमदाबादमध्ये रंगणार आहे. गुजरात संघाने पहिल्या दोन पराभवांनंतर सलग तीन लढतींमध्ये विजय मिळवत यंदाच्या मोसमात झोकात पुनरागमन केले आहे. मुंबई संघाने सलामीच्या लढतीत विजय मिळवला खरा, पण त्यानंतर सलग चार लढतींत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता गुजरातचा विजयरथ रोखण्याचे काम मुंबईला करावे लागणार आहे. तसेच या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com