

Ajinkya Rahane
esakal
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL)२०२६ चा ३८ वा सामना रविवारी (२६) कोलकाता नाईट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात झाला. या सामन्यात हंगामातील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकून लखनौच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब राहिली. ७३ धावांवरच कोलकाता संघाचे ६ विकेट्स पडले होते. परंतु संघाला रिंकू सिंगने सावरले. त्याने ५१ चेंडूत ८३ धावांची नाबाद खेळी केली.