Sunil Gavaskar : रोहित-ईशान किशनकडून भक्कम सलामी मिळत नसल्यामुळे मुंबईसाठी डोकेदुखी

सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात सलग दोन लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Sunil Gavaskar
Sunil Gavaskarsakal
Summary

सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात सलग दोन लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मुंबई - सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात सलग दोन लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या या पराभवांचे कारण देताना भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर म्हणाले, मुंबईच्या फलंदाजांकडून भागीदारी होत नाही. रोहित शर्मा व इशान किशन या सलामी जोडीकडून भागीदारी होत नसल्यामुळे मुंबईसाठी हे क्लेशदायक व डोकेदुखी ठरत आहे.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, कोणत्याही संघासाठी भागीदारी ही महत्त्वाची असते. तुम्ही जोपर्यंत मोठी भागीदारी करत नाही, तोपर्यंत संघाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही. मागील मोसमापासून मुंबईला हा प्रश्‍न सतावत आहे. रोहित शर्मा व इशान किशन या अनुभवी फलंदाजांकडूनही महत्त्वपूर्ण भागीदारी होऊ शकलेली नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा कराव्यात - टॉम मूडी

मुंबई व दिल्ली या दोन्ही संघांना अद्याप गुणांचे खाते उघडता आले नाही (सोमवारपर्यंतच्या लढतीपर्यंत). रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचाही पाय खोलात गेला आहे. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी म्हणाले, दिल्लीसाठी डेव्हिड वॉर्नर याने धावा करणे महत्त्वाचे आहे, पण त्याने कमी चेंडूंमध्ये जास्त धावा करायला हव्यात. शिवाय, पॉवरप्लेमधील फलंदाजीही निर्णायक ठरणार आहे. वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा करायला हव्यात, असे मूडी यांना वाटते.

फलंदाजीमध्ये सुधारणा आवश्यक - अमरे

नवी दिल्ली - दिल्ली कॅपिटल्स संघाकडे चांगल्या प्रतीचे फलंदाज आहेत; मात्र तरीही यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी आमच्या संघाची पॉवर प्लेमधील फलंदाजी अजून आक्रमक व्हायला हवी, असे मत व्यक्त केले आहे. दिल्लीच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या तिन्ही लढतींमध्ये मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दिल्लीच्या फलंदाजीवर याआधी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंग यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी सलग तीन पराभवांचे खापर कमकुवत झालेल्या फलंदाजीवर फोडले आहे. ‘मी दिल्लीच्या प्रशिक्षक संघात काम करत आहे. सहायक प्रशिक्षक म्हणून मी माझ्या संघातील सर्व खेळाडूंना जवळून ओळखत आलो आहे. कोणत्याही संघातील पहिल्या चार खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली, तर तो संघ आपोआप चांगल्या स्थितीत जातो. पहिल्या सहा षटकांमध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केल्यास आणि त्या काळात फलंदाजीमध्ये सुधारणा केल्यास दिल्ली अडखळत सुरुवात केल्यानंतरही यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद मिळवू शकते,’ असे मत अमरे यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com