IPL : आता फक्त गुणवत्तेवर भर; रिंकू सिंग

आयपीएलमध्ये यश मिळवल्यानंतरही भारतीय संघाचा विचार नाही.
 रिंकू सिंग
रिंकू सिंगsakal

कोलकता - कोलकता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. मात्र या संघामधून एक चेहरा चमकू लागला आहे. त्याचे नाव रिंकू सिंग. या मोसमात त्याने १४ सामन्यांमधून ४ अर्धशतकांसह ४७४ धावांचा पाऊस पाडला आहे. अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत लखनौ सुपर जायंटस्‌ संघाकडून त्यांचा अवघ्या एक धावेने पराभव झाला.

 रिंकू सिंग
Pune : उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करा; अजित पवार

रिंकू सिंग याने नाबाद ६७ धावांची खेळी साकारत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या लढतीनंतर रिंकू म्हणाला, सध्या फक्त सरावावर जोर देणार आहे. गुणवत्तेवर भर देणार आहे. भारतीय संघात निवड होण्याचा विचार मी करीत नाही.रिंकू पुढे म्हणाला, ‘‘आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मला छान फलंदाजी करता आली आहे.

तरीही या कामगिरीच्या आधारावर मला भारतीय संघाचे तिकीट मिळावे ही आशा बाळगत नाही. मी आता घरी जाईन. त्यानंतर दैनंदिन जीवन जगेन. सरावाकडे गांभीर्याने लक्ष देईन.’’ बहुतांशी बाबी मनाजोगत्या घडल्या. माझे कुटुंबही आनंदी आहे. नाव व प्रसिद्धी मिळत राहील, पण मी माझ्या कामावर लक्ष देणार आहे, असे तो स्पष्ट करतो.

 रिंकू सिंग
Mumbai : वकिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धक्का; आता वाहतूक पोलिसांत...

मेहनतीचे फळ - नितीश राणा

रिंकू सिंगला यंदाच्या मोसमात ठसा उमटवता आला. त्याच्या या कामगिरीचे कोलकता संघाचा कर्णधार नितीश राणा यानेही कौतुक केले. ‘‘रिंकू हा माझ्या जवळचा मित्र आहे. त्याने किती मेहनत केली आहे, याची मला जाण आहे. ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्याने केलेल्या मेहनतीला फळ मिळाले आहे. संपूर्ण देशाने हे बघितले आहे,’’ अशा शब्दांत नितीश याने त्याची स्तुती केली आहे.

 रिंकू सिंग
Mumbai : चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचे स्पष्ट; 'त्या' प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल!

गुजरातविरुद्धच्या लढतीत अखेरच्या षटकात ५ षटकार मारून कोलकताला जिंकून दिल्यानंतर जनतेकडून आदर मिळायला लागला. आता भारतातील जनता ओळखायला लागली. याचा आनंद मोठा आहे.

- रिंकू सिंग, खेळाडू, कोलकता नाईट रायडर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com