KKR vs SRH : 'द आंद्रे रसेल शो'; केकेआरने हैदराबादचा केला 54 धावांनी पराभव

IPL Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad
IPL Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad esakal

पुणे : आंद्रे रसलेने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सला सहावा विजय मिळवून दिला. केकेआरने सनराईजर्स हैदराबादचा 54 धावांनी पराभव करत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली. केकेआरचे 177 धावांचे आव्हान पार करताना हैदराबादने 20 षटकात 8 बाद 123 धावा केल्या. केकेआरकडून रसेलने 22 धावात 3 विकेट घेतल्या. फलंदाजीतही त्याने 28 चेंडूत नाबाद 49 धावा करत मोलाचे योगदान दिले. केकेआरकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर गोलंदाजीत उमारन मलिकने 33 धावात 3 बळी टिपले.

केकेआरने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. 

113-7 : आंद्रे रसेलने केल्या षटकात दोन शिकार

आंद्रे रसेलने 18 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर (4) आणि मार्को जेनसेनला (1) धावेवर बाद केले.

99-5 : उमेशने माक्ररमचा उडवला त्रिफळा

उमेश यादवने 32 धावांची खेळी करणाऱ्या माक्ररमचा त्रिफळा उडवला.

76-4 : सुनिल नारायणने पूरनला केले बाद

वेस्ट इंडीजच्या सुनिल नारायणने आपला देशबांधव निकोलस पूरनला अवघ्या 2 धावांवर बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला.

72-3 : वरूण चक्रवर्तीने हैदराबादला दिला मोठा धक्का

एका बाजूने पडझड होत असताना सलामीवीर अभिषेक शर्माने दमादार फलंदाजी करत डाव सावरला होता. मात्र 28 चेंडूत 43 धावा करणाऱ्या शर्माला चक्रवर्तीने बाद केले.

54-2 : राहुल त्रिपाठीकडून निराशा

साऊदीने राहुल त्रिपाठीला 9 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

30-1 : केन विल्यमसन झाला बाद

सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन पुन्हा एकदा फेल गेला. 17 चेंडूत 9 धावा करणाऱ्या विल्यमसनचा आंद्रे रसेलचा त्रिफळा उडवला.

आंद्रे रसेलची शेवटच्या षटकात वादळी खेळी

आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकत 20 धावा केल्या. या जोरावरच केकेआरने 177 धावांपर्यंत मजल मारली. रसेलने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या.

157-6 : 34 धावा करणारा सॅम बिलिंग्ज बाद 

94-5 : रिंकू सिंहकडून निराशा

83-4 : मलिकने श्रेयस अय्यरची केली शिकार

उमरान मलिकने तिसरी शिकार करत केकेआरला चौथा धक्का दिला. त्याने श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद केले.

72-3 : उमरान मलिकचा जलवा

उमरान मलिकने नितीश राणा पाठोपाठ 28 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला देखील बाद केले.

65-2 : नितीश राणा बाद

उमरान मलिकने केकेआरला दुसरा धक्का दिला. त्याने 26 धावा करणाऱ्या नितीश राणाला बाद केले.

55-1 (6 Ov) : रहाणे - नितीश राणाने अर्धशतकापर्यंत पोहचवले.

17-1 : केकेआरला पहिला धक्का

कोलकाता नाईट रायडर्सने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातच व्यंकटेश अय्यरला 7 धावांवर गमावले. त्याला मार्को जेनसेने 7 धावांवर बाद केले.

दोन्ही संघात बदल

केकेआरच्या संघात उमेश यादव आणि सॅम बिलिंग्ज यांचा समावेश करण्यात आला आहे. तर हैदराबादने आपाल्या संघात मोठे बदल केले. टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को जेनसेन यांनी संघात कमबॅक केले आहे.

केकेआरने नाणेफेक जिंकली

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com