IPL news : चेन्नई सुपरकिंग्सचा दणदणीत विजय

रवींद्र जडेजा, डेव्होन कॉनवेचा ठसा
चेन्नई सुपरकिंग्स
चेन्नई सुपरकिंग्सsakal

चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट राखून विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्सचा हा चौथा विजय ठरला. तर सनरायझर्स हैदराबादला चौथ्या पराभवाच्या नामुष्काचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजाची (३/२२) प्रभावी गोलंदाजी आणि डेव्होन कॉनवेच्या (नाबाद ७७ धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने विजय साकारला.

हैदराबादकडून मिळालेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईने तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. डेव्होन कॉनवे व ॠतुराज गायकवाड या सलामी जोडीने ८७ धावांची भागीदारी केली. ॠतुराज ३५ धावांवर धावचीत झाला. पण कॉनवे (नाबाद ७७ धावा) व मोईिन अली (नाबाद ६ धावा) या जोडीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कॉनवेने आपली खेळी १२ चौकार व १ षटकाराने सजवली.

दरम्यान, याआधी चेन्नई सुपरकिंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या फलंदाजांना या लढतीत चमक दाखवता आली नाही. हॅरी ब्रुक व अभिषेक शर्मा यांनी ३५ धावांची सलामी भागीदारी केली. आकाश सिंगच्या गोलंदाजीवर ब्रुक १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांना सूर गवसलाच नाही.

अभिषेकने ३४ धावांची खेळी केली. हीच हैदराबादकडून सर्वाधिक धावांची खेळी होती. राहुल त्रिपाठी (२१ धावा), एडन मार्करम (१२ धावा), हेनरीच क्लासेन (१७ धावा) या महत्त्वाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. एरव्ही सलामीला फलंदाजी करणारा मयांक अगरवाल या लढतीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो अवघ्या २ धावांवर बाद झाला.

चेन्नईकडून माहीश तीक्षणा व रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. तीक्षणा याने २७ धावा देत एक फलंदाज बाद केला. जडेजाने २२ धावा देत अभिषेक, राहुल व मयांक या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्को यान्सेन याने नाबाद १७ धावांची खेळी करीत हैदराबादला ७ बाद १३४ धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक ः सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत ७ बाद १३४ धावा (अभिषेक शर्मा ३४, राहुल त्रिपाठी २१, रवींद्र जडेजा ३/२२, आकाश सिंग १/१७, पराभूत वि. चेन्नई सुपरकिंग्स १८.४ षटकांत ३ बाद १३८ धावा (डेव्होन कॉनवे नाबाद ७७, ॠतुराज गायकवाड ३५, मयांक मार्कंडे २/२३).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com