IPL News : लखनौ सुपर जायंटस्‌चा दणदणीत विजय

पंजाब किंग्सवर ५६ धावांनी मात; अथर्व तायडेचे अर्धशतक
 Lucknow Super
Lucknow Super sakal

मोहाली : लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने शुक्रवारी पंजाब किंग्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचा हा पाचवा विजय ठरला. पंजाब किंग्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

काईल मेयर्स (५४ धावा), आयुष बदोनी (४३ धावा), मार्कस स्टॉयनिस (७२ धावा) व निकोलस पुरन (४५ धावा) यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने आयपीएलच्या इतिहासातील २५७ ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. पंजाबच्या अथर्व तायडेने अर्धशतक झळकवून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकविणारा विदर्भाचा पहिला फलंदाज हा मान मिळविला.

लखनौकडून मिळालेल्या २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबची सुरुवात अपेक्षेप्रमाणे निराशाजनक झाली. ३१ धावांमध्ये पंजाबने दोन विकेट गमावले. कर्णधार शिखर धवन (१ धाव) व प्रभसिमरन सिंग (९ धावा) हे बाद झाले. त्यानंतर अथर्व तायडे (६६ धावा) व सिकंदर रझा (३६ धावा) या जोडीने थोडीफार झुंज दिली. रवी बिश्‍नोईने अथर्वला, तर यश ठाकूरने रझाला बाद केले. बिश्‍नोईनेच लियाम लिव्हिंगस्टोनला २३ धावांवर बाद केले. पंजाबचा डाव २०१ धावांमध्येच आटोपला.

यश ठाकूर याने ३७ धावा देत ४ फलंदाज बाद केले. दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनौचा सलामीवीर काईल मेयर्सने नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजीला सुरुवात केली.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंटस्‌ २० षटकांत ५ बाद २५७ धावा (काईल मेयर्स ५४, आयुष बदोनी ४३, मार्कस स्टॉयनिस ७२, निकोलस पुरन ४५, कागिसो रबाडा २/५२) विजयी वि. पंजाब किंग्स १९.५ षटकांत सर्व बाद २०१ धावा (अथर्व तायडे ६६, यश ठाकूर ४/३७, नवीन उल हक ३/३०).

विक्रमी धावसंख्या

लखनौने ५ बाद २५७ धावा उभारत आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने २०१३मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत ५ बाद २६३ धावा फटकावल्या होत्या. आतापर्यंत बंगळूर संघाने उभारलेला विक्रम अबाधित आहे. त्या लढतीत ख्रिस गेलने नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. बंगळूरने ही लढत १३० धावांनी जिंकली हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com