IPL news : मुंबई संघाला आता सातत्याची गरज

वानखेडेवर आज पंजाबशी लढत; आर्चरच्या पुनरागमनाने ताकद वाढली
Jofra Archer
Jofra Archersakal

मुंबई : मागील तीन लढतींमध्ये विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ विजयी वाटचाल कायम राखण्यासाठी उद्या मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ उद्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्सचा सामना करील. एकीकडे मुंबई इंडियन्सचा संघ सलग चौथा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल, तर दुसरीकडे शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्सचा संघ चौथा पराभव टाळण्यासाठी मेहनत घेताना दिसेल.

कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन ही सलामीची जोडी मुंबईला दमदार सुरुवात करून देत आहे. या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य आहे. अर्थात मोठी खेळी अद्याप दोन्ही फलंदाजांकडून झालेली नाही. कॅमेरुन ग्रीन व टीम डेव्हिड या परदेशी खेळाडूंनीही मुंबई संघाला गरज असताना आपला खेळ उंचावला आहे. मात्र मुंबईसमोर मोठा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण होत आहे, तो म्हणजे सूर्यकुमार यादव मधल्या फळीत कशी कामगिरी करतोय याचा.

सूर्यकुमारला मागील काही आंतरराष्ट्रीय व आयपीएल लढतींमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.

जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर याच्यावर मुंबईची मदार होती, पण आर्चरलाही पहिल्या लढतीनंतर दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे मागील चार लढतींत त्याला खेळवण्यात आले नाही. आता गुरुवारी त्याने नेटमध्ये चार षटके गोलंदाजी केली. तो तंदुरुस्त होत आहे, पण पंजाबविरुद्धच्या लढतीत तो खेळणार नाही.

पुढील आठवड्यात तो खेळण्याची दाट शक्यता आहे. जेसन बेहरेनडॉर्फ, रायली मेरेडीथ या परदेशी गोलंदाजांनी मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. पियुष चावला, ऋतिक शोकीन यांनी फिरकीची बाजू सांभाळली. कॅमेरुन ग्रीन फलंदाजीसह गोलंदाजीतही ठसा उमटवतोय. अर्जुन तेंडुलकरने दोन्ही लढतींत दिलेले काम पार पाडले आहे.

धवनच्या अनुपस्थितीचा फटका

पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. त्याने पहिल्या चार लढतींमध्ये २३३ धावांची फटकेबाजी केली. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे मागील दोन लढती खेळू शकला नाही. याचा फटका त्यांना बसला आहे. मागील चारपैकी तीन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

परदेशी खेळाडूंनी खेळ उंचवावा

पंजाबच्या खेळाडूंना आता खेळ उंचावण्याची गरज आहे. प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, जितेश शर्मा, शाहरुख खान या भारतीय खेळाडूंनी फलंदाजीत चमक दाखवायला हवी, तसेच मॅथ्यू शॉर्ट, लिव्हिंगस्टोन, सॅम करन, नॅथन इलिस या परदेशी खेळाडूंनी दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.

आजच्या लढती

लखनौ सुपर जायंटस्‌ -

गुजरात टायटन्स

वेळ - दुपारी ३.३० वाजता

स्थळ - लखनौ

प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स

आजच्या लढती

मुंबई इंडियन्स- पंजाब किंग्स

वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता

स्थळ- मुंबई

प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स,

जिओ सिनेमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com