No Place for Ayush, Urvil or Brevis in CSK 2026 Plans? चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधून गाशा गुंडाळावा लागला आहे. ११ सामन्यांत या संघाला फक्त दोन विजय मिळवता आल्याने ते गुणतालिकेत तळाच्या क्रमांकावर आहेत. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे ५ सामन्यानंतर माघार घ्यावी लागली आणि MS Dhoni पुन्हा कर्णधार झाला. तरीही CSK ला पुनरागमन करता आले नाही. या प्रवासात पाचवेळच्या विजेत्या चेन्नईने संघात काही युवा खेळाडूंना करारबद्ध केले. १७ वर्षीय आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेव्हिस व उर्विल पटेल यांची संघात खोगीर भरती करून घेतली. आयुष व ब्रेव्हिस यांनी दमदार खेळ करून त्यांची निवड सार्थ ठरवली, परंतु CSK ला आयपीएलच्या पुढील पर्वात या तिन्ही खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार आहे का?