IPL 2024 Delhi Capitals : ऋषभ पंत दिल्लीत नाही तर 'इथं' करणार पदार्पण; DC कुठं खेळणार पहिले दोन सामने?

IPL 2024 Schedule Delhi Capitals : आयपीएल 2024 चे वेळापत्रक हे दोन सत्रात घोषित होईल. आज पहिल्या 21 सामन्यांचे शेड्युल होणार जाहीर
IPL 2024 Delhi Capitals Playing in Pune
IPL 2024 Delhi Capitals Playing in Pune esakal

IPL 2024 Delhi Capitals Playing in Pune : आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांसाठीचे वेळापत्रक आज जाहीर झाले. बीसीसीआयने आज पहिल्या 21 सामन्यांसाठी वेळापत्रक जाहीर केलं. यात दिल्ली कॅपिटल्स आपला एकही सामना होम ग्राऊंड अरूण जेटली स्टेडियमवर खेळणार नाहीये. त्यामुळे ऋषभ पंतचे पुनरागमन हे दिल्लीत नाही तर मोहालीत होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम यावेळी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. कारण अरूण जेटली स्टेडियमवर वुमन प्रीमियर लीगचा अंतिम सामना होणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा आज होणार आहे.

IPL 2024 Delhi Capitals Playing in Pune
IPL 2024 15 Day Schedule : आयपीएलचे 15 दिवसांचेच शेड्युल; लोकसभा निवडणुकीमुळं अर्धा हंगाम होणार परदेशात?

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना हा 23 मार्चला पंजाब किंग्जविरूद्ध होत आहे. हा सामना मोहालीत होणार आहे. तर दिल्लीचा दुसरा सामना हा राजस्थान रॉयल्सविरूद्ध जयपूरमध्ये 28 मार्चला होणार आहे. तर 31 मार्चला चेन्नईविरूद्ध विशाखापट्टणममध्ये होणार आहे. तसेच 3 एप्रिलला देखील दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. हा सामना केकेआर विरूद्ध होईल. तसेच 7 एप्रिलला दिल्ली अन् मुंबई वानखेडेवर भिडणार आहेत.

IPL 2024 Delhi Capitals Playing in Pune
IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : खेळपट्टी पाहून बेन स्टोक्स हादरला; रांची पिचचं कोडं काही उलगडेना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com