IPL 2022 : खेळाडू रिटेन करण्यासंदर्भात मोठी बातमी

मेगा लिलावापूर्वी सध्याच्या संघांना प्रत्येकी 4-4 खेळाडू रिटेन करता येणार असल्याचे वृत्त आहे.
Rohit Sharma And MS Dhoni
Rohit Sharma And MS DhoniSakal

आयपीएलच्या (IPL) च्या आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सध्याच्या आठ संघात मोठे बदल पाहायला मिळतील. याशिवाय दोन नवे संघही मैदानात उतरण्यासाठी सज्ज असतील. मेगा लिलावापूर्वी सध्याच्या आठ फ्रँचायझी संघांना किती खेळाडूंना रिटेन करता येणार? असा प्रश्न सर्वांच्याच मनात घर करुन आहे. मेगा लिलावापूर्वी सध्याच्या संघांना प्रत्येकी 4-4 खेळाडू रिटेन करता येणार असल्याचे वृत्त आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझी संघाला 4 खेळाडू रिटेन करण्याची संधी देणार आहे. दोन नव्या संघासह आगामी हंगामात दहा संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. प्रत्येक फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी 90 कोटी रुपये असतील. ही रक्कम 95 ते 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. रिटेन करणाऱ्या खेळाडूंसाठी फ्रँचायझी संघाला पर्समधील 40 ते 45 टक्के रक्कम खर्च करावी लागेल. सध्याच्या संघांना लिलावावेळी राइट टू मॅच (RTM) कार्ड वापरता येणार नसल्याची माहितीही बीसीसीआयने फ्रँचायझी संघांना दिली आहे.

Rohit Sharma And MS Dhoni
शोएब अख्तर म्हणतो, आमच्यासाठी हा क्रिकेटर 'भारताचा इंजमाम'!

दोन नव्या संघांच्या खरेदीची प्रक्रिया पार पडल्यानंतर रिटेंशन पॉलिसीसंदर्भात अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात येणार आहे. 25 आक्टोबरला आयपीएलमधील दोन संघ कोणते याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. नवे संघ कोणते असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Rohit Sharma And MS Dhoni
T20 World Cup : सराव सामन्यांनी अंदाज आला

रिटेंशनसाठी 4 खेळाडूंना परवानगी दिली गेली तर चेन्नई सुपर किंग्जकडून महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कर्णधारपद सोडलेल्या विराट कोहलीला रिटेन करु शकते. याशिवाय अन्य नावे कोणती असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com