IPL 2025 playoffs in Mullanpur, Ahmedabad to host Final
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या वेळापत्रकात पुन्हा एक बदल करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात २३ मे रोजी बंगळुरूत सामना होणार होता. RCB चा हा घरच्या मैदानावरील शेवटचा साखळी सामना होता, परंतु तो आता लखनौ येथे होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २३ मे रोजी बंगळुरूत मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे RCB vs SRH हा सामना लखनौ येथे होईल आणि त्यानंतर तेथेच २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळतील.