esakal | IPL 2021 Video: बाबोsss .... असा 'हवाई थ्रो' तुम्ही आधी कधी पाहिलाय?
sakal

बोलून बातमी शोधा

Williamson-Throw-Maxwell-Out

मॅक्सवेल रन घेत असताना विल्यमसनने हवेत उडी मारत चेंडू फेकला अन्...

Video: बाबोsss .... असा 'हवाई थ्रो' तुम्ही आधी कधी पाहिलाय?

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs SRH Video: आधीच प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेल्या बंगळुरू संघाला बुधवारी तळाशी असलेल्या हैदराबाद संघाकडून हार पत्करावी लागली. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असल्याने हैदराबादला फारशी फटकेबाजी करता आली नाही. २० षटकात SRH ने १४१ धावा केल्या. हे आव्हान पार करताना RCB ला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या षटकात एबी डिव्हिलियर्स मैदानात असूनही भुवनेश्वर कुमारने हैदराबादला विजय मिळवून दिला. या सामन्यात चर्चा रंगली ती एका 'हवाई थ्रो' ची...

RCB संघ १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. सलामीवीर विराट कोहली (५), डॅन ख्रिश्चन (१) आणि श्रीकर भरत (१२) हे तिघे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला मैदानात पाठवण्यात आले. मॅक्सवेलने सुरूवात चांगली केली होती, पण देवदत्त पडीकल बरोबर एक चोरटी धाव घेणं त्याला महागात पडलं. पडीकलने राशिद खानच्या गोलंदाजीवर हळूच चेंडू टोलवला. धाव घेण्यासाठी मॅक्सवेलनेही होकार दिला. त्यामुळे दोघे धावले. पण SRH चा कर्णधार विल्यमसनने तुफान वेगाने चेंडू अडवला आणि हवेत उडी मारून हवाई थ्रो केला. चेंडूचा थ्रो इतका अचूक होता की मॅक्सवेल धावबाद झाला आणि २५ चेंडूत ४० धावा काढून माघारी परतला.

फलंदाजीसाठी अवघड असलेल्या पिचवर मॅक्सवेलने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण विल्यमसनने त्याला धावबाद करून सामना पलटवला. त्यामुळे विल्यमसनला सामनावीरही घोषित करण्यात आले.

loading image
go to top