Shah Rukh Khan unseen moments: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ संघर्ष करताना दिसतोय. गतविजेत्यांना ९ सामन्यांत फक्त ७ गुण कमावता आले आहेत. काल पंजाब किंग्सविरुद्धचा घरच्या मैदानावरील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या सह मालकिचा हा संघ पुढील पाचही सामन्यांत जोर लावेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. याच दरम्यान KKR सोबत २०१० ते २०१६ या कालावधीत गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या वसीम अक्रम ( Wasim Akram) याने शाहरूख खानबद्दल एक गोष्ट सांगितली, जी अनेकांना माहितही नव्हती.