IPL 2024 : 'एकतर संपूर्ण हंगाम खेळा, नाहीतर खेळायला येऊ नका....', इंग्लिश खेळाडूंवर संतापला भारतीय दिग्गज

Irfan Pathan slams England players : आता काही दिवसात आयपीएल 2024 ची सांगता होणार आहे.
Irfan Pathan slams England players for leaving IPL 2024
Irfan Pathan slams England players for leaving IPL 2024

Irfan Pathan slams England players : आता काही दिवसात आयपीएल 2024 ची सांगता होणार आहे. त्यानंतर काही खेळाडू वर्ल्ड कप खेळण्यासाठी व्यस्त होतील. यासाठी अनेक खेळाडूंनी आपले सामानही बांधले असून ते अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहेत. यादरम्यान भारतीय दिग्गज खेळाडू इरफान पठाणनेह इंग्लिश खेळाडूंना चांगलेच फटकारले आहे. याबाबत त्याने ट्विटरवर ट्विट करून आपले मत व्यक्त केले.

Irfan Pathan slams England players for leaving IPL 2024
Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

इरफान पठाणने ट्विटरवर लिहिले की, “एकतर संपूर्ण हंगामा खेळा. नाहीतर खेळायला येऊ नका.” इंग्लड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपपूर्वी संघात सामील होण्यास सांगितले आहे. त्यानंतर अनेक खेळाडूही परत जात आहेत. सॅम करनने बुधवारी पुष्टी केली की तो आणि जोस बटलर येत्या काही दिवसांत अमेरिकेला रवाना होतील.

Irfan Pathan slams England players for leaving IPL 2024
Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर यापुढे आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार नाही. बटलर हा इंग्लंड संघाचा कर्णधारही आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला एकदा वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.

अलीकडेच राजस्थान रॉयल्सने त्याच्या पुनरागमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आघाडीचे फलंदाज विल जॅक आणि रीस टोपले हेही आपल्या देशात परतले आहेत. जॅकने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com