
Expert picks for IPL 2025 team of the season : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब किंग्सचा पराभव केला आणि १८ व्या पर्वात पहिले जेतेपद नावावर केले. आता आयपीएलमधील सर्वोत्तम संघात कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू व समालोचक इरफान पठाण याने आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम १२ खेळाडू निवडले आहेत. पण, त्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या शुभमन गिलचे नाव नाही.