IPL 2024, GT vs MI: काही तरी शिजतय..., मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर ईशान किशन-जय शाह यांच्यात गहन चर्चा, Photo व्हायरल

Ishan Kishan - Jay Shah Conversation: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर ईशान किशन आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या संभाषणानेही सर्वांचे लक्ष वेधले.
Jay Shah - Ishan Kishan | IPL 2024
Jay Shah - Ishan Kishan | IPL 2024 Sakal

Ishan Kishan - Jay Shah Conversation: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेत रविवारी (24 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 6 धावांनी पराभूत केले. दरम्यान अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यातील निकालाबरोबरच अन्य गोष्टींचीही सामन्यानंतर बरीच चर्चा झाली.

ईशान किशन आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या संभाषणानेही सर्वांचे लक्ष वेधले.

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी जय शाह यांनीही हजेरी लावली होती. यावेळी सामना संपल्यानंतर ते अन्य खेळाडूंना भेटण्याबरोबरच मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनलाही भेटले.

त्यांच्यात हसून खेळून बराच वेळ गप्पा चाललेल्याही दिसून आले. त्यांच्या चर्चेत काहीवेळाने रोहित शर्माही सामील झाल्याचे दिसले होते.

Jay Shah - Ishan Kishan | IPL 2024
Viral Video : अखेर बॉस कोण पांड्यानं दिलं दाखवून.... रोहित शर्माला थेट बाउंड्रीवर पाठवलं

ईशान आणि जय शाह यांच्या चर्चेदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच युजर्सकडून विविध कयास लावले जात आहेत. एका युजरने त्यांच्या चर्चेदरम्यानचा फोटो शेअर करत लिहिले आहे की 'जय शाह ईशान किशनची चर्चा करत आहे, काहीतरी शिजतय.' तर काहींनी ते नक्की काय बोलत असतील, असे प्रश्नही विचारले आहेत.

का होतेय जय शाह आणि ईशान किशन यांच्यातील संभाषणाची चर्चा?

ईशान किशन नोव्हेंबर 2023 पासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. 2023 च्या अखेरीस त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. मानसिक थकव्याचे कारणाने त्याने ही माघार घेतल्याचे म्हटले जात होते. पण त्यानंतरही तो भारतीय संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध राहिला नाही.

तसेच देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफीतील सामनेही या काळात त्याने खेळले नाही. त्याचमुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्याला रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सांगण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

Jay Shah - Ishan Kishan | IPL 2024
IPL 2024, GT vs MI: आकाश अंबानीच्या समोरच हार्दिकने मिठी मारताच रोहित भडकला? व्हायरल Video मुळे चर्चांना उधाण

त्यातच बीसीसीआयने जाहीर केलेल्या राष्ट्रीय वार्षिक करारात ईशान किशनचा समावेश करण्यात आला नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व न दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचीही चर्चा झाली.

कारण वार्षिक करार जाहीर करताना बीसीसीआयने स्पष्ट केले होते की राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यायला हवे.

गुजरातविरुद्ध ईशानला अपयश

दरम्यान, गुजरातविरुद्ध मोठ्या धावा करण्यात ईशानला अपयश आले. तो पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. या सामन्यात गुजरातने मुंबईला 169 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 162 धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com