किशन म्हणतो माझ्या डोक्यात 15.25 कोटी रूपये होते पण... | Ishan Kishan Says Auction hefty amount was in my mind | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishan Kishan Says Auction hefty amount was in my mind

किशन म्हणतो माझ्या डोक्यात 15.25 कोटी रूपये होते पण...

मुंबई : आयपीएलच्या 2022 च्या हंगामात (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या इशान किशनवर (Ishan Kishan) सर्वाधिक 15.25 कोटी रूपयांची बोली लागली. या बोलीनंतर इशान किशनची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र 15 व्या हंगामात इशान किशनला फारशी चमक दाखवता आली नाही. आतापर्यंत त्याने 321 धावाच केल्या आहेत. याबाबत बोलताना इशान किशनने मान्य केले की त्याच्या डोक्यात सतत 15.25 कोटी रूपयांची बोली (Auction Amount) घोळत होती. मात्र भारतीय संघातील त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्याला याबाबत विचार न करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा: इंग्लंडकडून मोठी ऑफर; मॅक्युलम केकेआर सोडणार?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात उद्या ( दि. 12 ) हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी इशान किशनने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'लिलावात मोठी रक्कम मिळाल्याचा दबाव माझ्यावर काही दिवस होता. याची जाणीव झाल्यानंतर मी वरिष्ठ खेळाडूंशी याबाबत चर्चा केली आणि त्याचा मला फायदा झाला.' किशन पुढे म्हणाला की, 'अनेक वरिष्ठ खेळाडू जसे की रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मला मोठ्या रक्कमेबाबत विचार न करण्याचा सल्ला दिला. कारण मी काही ही रक्कम मागितली नव्हती. कोणालातरी माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच एवढी मोठी बोली लावली. मोठ्या रक्कमेबाबत विचार करण्याऐवजी मी माझ्या खेळात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करायला हवा. वरिष्ठांशी बोलल्यानंतर मला त्याचा फायदा झाला कारण हे सर्वजण या स्थितीतून गेले आहेत.'

हेही वाचा: एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतणार; विराटने दिले संकेत

इशान किशनने सांगितले की, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मला माझा नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. संघात प्रत्येकाची एक भुमिका आहे. माझी भुमिका ही संघाला चांगली सुरूवात करून देणे ही आहे. जर मी क्रीजवर टिकून राहिलो तर मला 30, 40 धावांवर बाद होण्यापासून वाचलं पाहिजे. मला या चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या धावांमध्ये करणे गरजेचे आहे.

Web Title: Ishan Kishan Says Auction Hefty Amount Was In My Mind Rohit Sharma Virat Kohli Help Me

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top