'15 कोटींची काय गरज होती, 50 रुपयांत चांगला ओपनर मिळाला असता'

टी ट्वेन्टी मध्ये कसोटीची इनिंग करणाऱ्या या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे
Ishan Kishan Trolled
Ishan Kishan TrolledSAKAL

IPL 2022: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला (MI) आणखी एक पराभवाचा सामना करायला लागला आहे. हंगामात विजयाचे खाते उघडण्याची तळमळ असलेल्या मुंबई संघाला सलग ८ वा पराभव पत्करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स बरोबर रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा 36 धावांनी पराभव झाला. सामन्यानंतर मुंबई संघाचा सलामीवीर ईशान किशनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. याचं कारण म्हणजे या छोट्या फॉरमॅटच्या झटपट क्रिकेटमध्ये त्याने या सामन्यात 20 चेंडू खेळून केवळ 8 धावा करता आल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट फक्त 40 चा होता.(Ishan Kishan Trolled)

मेगा लिलावात सर्वात महाग विकला गेला ईशान किशन

आयपीएल मेगा लिलावात यावेळी 23 वर्षीय ईशान किशन हा सर्वात महागडा विकला जाणार खेळाडू ठरला होता. मुंबई संघाने त्याच्यावर सर्वाधिक 15.25 कोटींची बोली लावली होती. अशा महागड्या विकणाऱ्या खेळाडूकडून चाहते आणि फ्रँचायझ ही मोठ्या खेळीची अपेक्षा होत्या. मात्र ईशानच्या या परफॉर्मन्सनंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे. 15 कोटींच्या ईशान किशनऐवजी त्याने 50 रुपयांना एखादा सलामीवीर खरेदी केला असता. ते हे चांगले झाले असते.

मुंबईच्या या युवा सलामीवीराने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहे. यादरम्यान 28.43 च्या सरासरीने 199 धावा केल्या आहे. ईशानने या हंगामात आतापर्यंत दोन अर्धशतक ठोकले आहे. एवढे सगळे करूनही या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू मुंबईला एकही विजय मिळवून देऊ शकला नाही.

Ishan Kishan Trolled
IPL 2022: चेन्नईला लय सापडणार का? वानखेडे स्टेडियमवर पंजाबशी लढत

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रविवारी मुंबईचा सामना खेळल्या गेला. त्यात मुंबईला ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने 6 गडी बाद 168 धावा केल्या होत्या. कर्णधार केएल राहुलने 62 चेंडूत 103 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 8 बाद 132 धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्माने 39 आणि तिलक वर्माने 38 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com