
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुजरात टायटन्सने सलग तीन विजयांची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादच्या ८ बाज १५२ धावांचा गुजरातने १६.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डी ( ३१), हेनरिच क्लासेन ( २७) व पॅट कमिन्स ( २२*) यांनी चांगला खेळ केला. गुजरातच्या मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर साई किशोर व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ४३ चेंडूंत नाबाद ६१ धावांची खेळी केली, तर वॉशिंग्टन सुंदरने २९ चेंडूंत ४९ धावा केल्या, तर शेरफाने रुथरफोर्ड १६ चेंडूंत ३५ धावांवर नाबाद राहिला.