
Jasprit Bumrah Comeback in Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध भिडणार आहे. या सामना मुंबईला कर्णधार हार्दिक पांड्या व प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय खेळावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने व मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांची आज पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये हार्दिक पांड्याने मुंबईचा कर्णधार जाहीर केला. तर प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी जसप्रीत बुमराहच्या संघात परतण्याबाबत अपडेट्स दिले.