esakal | 'मिसेस बुमराह'चा समुद्रकिनारी काढलेला हॉट फोटो चर्चेत | Sanjana Bumrah
sakal

बोलून बातमी शोधा

'मिसेस बुमराह'चा समुद्रकिनारी काढलेला हॉट फोटो चर्चेत

तुम्ही पाहिलात का जसप्रीत बुमराहच्या पत्नीचा 'तो' फोटो?

'मिसेस बुमराह'चा समुद्रकिनारी काढलेला हॉट फोटो चर्चेत

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या त्याची पत्नी संजना गणेशन हिच्यासोबत युएईमध्ये आहे. IPL स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स संघाकडून बुमराह खेळत आहे. पत्नी संजना त्याच्यासोबत मुंबईच्या संघ राहत असलेल्या हॉटेलमध्येच वास्तव्यास आहे. IPLच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सकडून मुलाखतकाराच्या भूमिकेतदेखील ती आहे. त्यामुळे ती तेथे वास्तव्यास आहे. पण त्यासोबतच ती आपला पती जसप्रीत बुमराह याच्यासोबत युएईमधील समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवत असल्याचेही दिसत आहे. तिचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा फोटो तिने समुद्र किनाऱ्यावर काढला आहे. हा फोटो जसप्रीतने काढला असून संजना गणेशनने त्याला आपला सर्वात चांगला मित्र असंही म्हटलं आहे.

पाहा फोटो-

दरम्यान, संजना गणेशन ही सुरूवातीच्या काळात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत स्टार अँकर म्हणून काम पाहत होती. ती IPL च्या हंगामात सर्व खेळाडूंसोबत दौरा करायची. या दरम्यान या दोघांमध्ये प्रेम फुललं आणि काही महिन्यांपूर्वी ते विवाहबंधनात अडकले. बुमराह आणि संजना दोघेही क्रीडा जगताशी संबंधित असल्याने त्यांची केमिस्ट्री खूपच चांगली असल्याचे दिसते.

सध्या बुमराह मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहेत. मुंबईला प्ले ऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सच्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

loading image
go to top