मुंबई जोफ्राला घेऊन फसली? इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यामुळे अनिश्चितता Jofra Archer been ruled out of the entire season | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jofra Archer been ruled out of the entire season

मुंबई जोफ्राला घेऊन फसली? इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यामुळे अनिश्चितता

लंडन : इंग्लंडचा वेगावान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पाठीच्या दुखण्यामुळे (Lower Back Fracture) संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (EBC) दिली. याचा अर्थ जोफ्रा आर्चर जुलैमध्ये होणाऱ्या भारताविरूद्धच्या कसोटीला देखील मुकणार आहे. जोफ्रा आर्चरच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सला देखील यंदाच्या आयपीएल हंगामात मोठा फटका बसला आहे. मुंंबईने 2020 च्या आयपीएल मेगा लिलावात तब्बल 8 कोटी रूपये खर्चून आपल्या संघात घेतले होते.

याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अधिकृतरित्या दिलेल्या वक्तव्यात सांगितले की, 'जोफ्रा आर्चरच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर (Lower Back Fracture) असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे इंग्लंडच आणि ससेक्सचा वेगावान गोलंदाज जोफ्रा आर्चर उर्वरित संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.' विशेष म्हणजे इसीबीने तो कधी परत येणार याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. म्हणजे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

'जोफ्रा कधी परतणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत तज्ज्ञांचे मत काही दिवसात येईल त्यानंतर व्यवस्थापन त्याच्याबाबत काही योजना आखू शकले.' भारत जुलै महिन्यात एकमेव कसोटी सामना जो गेल्या दौऱ्यात राहिला होता तो खेळेल. तसेच सहा मर्यादित षटकांचे सामने देखील खेळले जातील.

27 वर्षाच्या जोफ्रा मार्च 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. भारताविरूद्धच्या या मालिकेनंतर त्याच्या खोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने ससेक्सकडून काऊंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या जाणवू लागली. बार्बाडोसमध्ये जन्मालेल्या जोफ्राने इंग्लंडकडून 42 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तीनही फॉरमॅटमध्ये त्याने 86 विकेट्स घेतल्या आहेत.