"ये बच्चों का खेल नहीं" तीन शतकं ठोकूनही बटलर होतोय ट्रोल

कोहलीचा हा विक्रम मोडणे कोणत्याही लहान मुलांचा खेळ नाही.
 virat kohli ipl 2016 most runs record
virat kohli ipl 2016 most runs record sakal

जोस बटलरची बॅट या आयपीएलमध्ये चांगलीच धुमाकूळ घालत आहे. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या बॅट शांत दिसत आहे. लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात पण तस काही झालं. बटलर फक्त 2 धावा करत आउट झाला. आता तर राजस्थान संघ जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. परंतु जोस बटलरची बॅट शांत दिसत आहे. बटलरला या हंगामात विराट कोहलीचा एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडता येत होता. पण सध्या तो अशक्य दिसत आहे. (Virat Kohli IPL Most Runs Record)

 virat kohli ipl 2016 most runs record
CSK च्या ताफ्यात 'बेबी मलिंगा' म्हणून एन्ट्री केलेला पथिराना आहे तरी कोण?

आयपीएलच्या पहिल्या सात सामन्यात जोस बटलरची फलंदाजी पाहून असं वाटत होत की तो विराट कोहलीचा आयपीएल हंगामात 973 सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सहज मोडू शकतो असे वाटत होते. पण जसजशी हंगामा पुढे सरत गेली, तसतसे विराटच्या विक्रम लांब होत गेला. त्यावरून बटलरला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. कोहलीचा हा विक्रम मोडणे कोणत्याही लहान मुलांचा खेळ नाही.

 virat kohli ipl 2016 most runs record
Women IPL: नगरच्या शेतकऱ्याची मुलगी गाजवणार आयपीएलचं मैदान

बटलर सध्या विराटच्या विक्रमापासून 346 धावा दूर आहे. त्याच्याकडे आता जास्तीत जास्त तीन किंवा चार सामने आहेत. मग त्याला आता प्रत्येक सामन्यात शतक करावी लागणार आहे. विराट कोहलीचा हा विक्रम त्याच्या आवाक्याच्या बाहेर दिसत आहे. याच कारणामुळे जोस बटलरला सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com