
Women IPL: नगरच्या शेतकऱ्याची मुलगी गाजवणार आयपीएलचं मैदान
अहमदनगर : पाथर्डी मधील शेतकऱ्याच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर आयपीएल महिला टी- २० (Women IPL) क्रिकेटमध्ये धडक मारली आहे. महिलाच्या आयपीएल 23 मे पासून सुरूवात होत आहे. आयपीएलसाठी निवड झालेली आरती केदार हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात एस वी नेट अकॅडमी मधून आयपीएलमध्ये खेळण्याचा मान मिळणार आहे. (Ahmadnagar Arati Kedar Play Women IPL 2022)
हेही वाचा: "ये बच्चों का खेल नहीं" तीन शतकं ठोकूनही बटलर होतोय ट्रोल
आरतीचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले आहे, आणि माध्यमिक शिक्षण पाथर्डीतील एम. एम. निन्हाळी विद्यालयात झाले. आरती आता तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने काही दिवसांपुर्वी वरिष्ठ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील अष्टपैलू क्रिकेटपटू आरती केदारने सर्वाधिक 15 विकेट घेतल्या. यापूर्वी ही महाराष्ट्रकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा: RR vs LSG: लखनौने प्लेऑफमध्ये स्थान गमावले? हे 5 खेळाडू ठरले खलनायक
महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात अष्टपैलू कामगिरी करीत संघात विजयात मोठा वाटा उचलला होता. २०२१ मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी तिची निवड झाली होती. २३ मेपासून होणाऱ्या महिला आयपीएल स्पर्धेत आरती व्हेलोसिटी या संघाकडून खेळताना आपल्या दिसणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून आयपीएलसाठी निवड झालेली आरती ही पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती ही पाथर्डी येथील एस व्ही नेट ॲकॅडमीमध्ये सराव करत आहे.
Web Title: Ahmadnagar Arati Kedar Play Women Ipl 2022 Cricket News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..