IPL 2024 RCB vs RR
IPL 2024 RCB vs RRsakal

IPL 2024 RCB vs RR : विराट शेर... बटलर सव्वाशेर ; कोहलीचे शतक, पण बंगळूरची हार

बंगळूरचा विराट कोहली शेर, तर राजस्थानचा जॉस बटलर सव्वाशेर ठरला. विराटच्या शतकानंतरही (नाबाद ११३) बंगळूर संघावर पराभवाची नामुष्की आली; तर बटलरच्या (नाबाद १००) शतकामुळे राजस्थानने विजयास गवसणी घातली.

जयपूर : बंगळूरचा विराट कोहली शेर, तर राजस्थानचा जॉस बटलर सव्वाशेर ठरला. विराटच्या शतकानंतरही (नाबाद ११३) बंगळूर संघावर पराभवाची नामुष्की आली; तर बटलरच्या (नाबाद १००) शतकामुळे राजस्थानने विजयास गवसणी घातली. विराट कोहलीच्या नाबाद ११३ धावांनंतरही प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळूरला १८३ धावाच करता आल्या. यात कोहलीचा वाटा ११३ आणि अवांतर धावांचा वाटा ११ धावांचा म्हणजे इतर पाच जणांना केवळ ५९ धावा करता आल्या. विराट कोहलीचे हे आयपीएलमधील आठवे शतक ठरले; परंतु त्यासाठी त्याने ६७ चेंडू घेतल्यामुळे हे शतक आयपीएलमधील संथ शतकांत गणले गेले.

राजस्थानला विजयी करताना बटलरने षटकार मारला आणि आपले शतक पूर्ण केले. याच बटलरने कर्णधार संजू सॅमसनसह १४८ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सोपा केला. विशेष म्हणजे यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर बटलर-सॅमसन यांनी ही भागीदारी केली. अगोदरच्या सामन्यात फार धावा न करू शकलेल्या कोहलीच्या बॅटने आज विराट रूप धारण केले होते.

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची दाणादाण उडवत रोहित शर्मासह तीन फलंदाज शून्यावर बाद करणारा राजस्थानचा ट्रेंट बोल्ड आज विराटसमोर निष्प्रभ ठरला. तो त्याच्या वाट्याची चार षटकेही पूर्ण करू शकला नाही. बोल्ट आणि नांद्रे बर्गर यांच्यावर हल्ला करणाऱ्या विराटने कर्णधार फाफ डुप्लेसीसह १२५ धावांची सलामी दिली; परंतु त्यानंतर मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन हे खंदे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे बंगळूरला अपेक्षित द्विशतकी मजल मारता आली नाही.

संक्षिप्त धावफलक :

बंगळूर : २० षटकांत ३ बाद १८३ (विराट कोहली नाबाद ११३ - ७२ चेंडू, १२ चौकार, ४ षटकार, फाफ डुप्लेसी ४४ - ३३ चेंडू, २ चौकार, २ षटकार, युझवेंद्र चहल ४-०-३४-२)

राजस्थान १९.१ षटकांत ४ बाद १८९ (जॉस बटलर नाबाद १०० - ५८ चेंडू, ९ चौकार, ४ षटकार, संजू सॅमसन ६९ - ४२ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, टोपले ४-०-२७-२)

आयपीएलमधील संथ शतके

६७ चेंडू : मनीष पांडे

६७ चेंडू : विराट कोहली

६६ चेंडू : सचिन तेंडुलकर

६६ चेंडू : जॉस बटलर

६६ चेंडू : डेव्हिड वॉर्नर

६४ चेंडू : केविन पीटरसन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com