IPL Final 2025 Royal Challengers Bengaluru Lucky Man : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षानंतर अखेर इंडियन प्रीमिअर लीगची ट्रॉफी उंचावली. आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये बंगळुरूने ६ धावांनी पंजाब किंग्सला पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर RCB च्याच नावाचा जयघोष पाहायला मिळाला, विराट कोहली भावनिक झाला आणि त्याचे आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते. त्याने पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून आपला आनंद साजरा केला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कृणाला पांड्या ( Krunal Pandya) ने मॅच विनिंग स्पेल टाकली, पंरतु एक असा खेळाडू जो बंगळुरूसाठी लकी ठरला.