
उमरान मलिक जर पाकिस्तानी असता तर... अकमल बरळलाच
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी विकेटकिपर कामरान अकमल (Kamran Akmal) हा सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात पाटाईत आहे. कामरान अकमलने जम्मू काश्मीरचा उद्योन्मुख वेगावान गोलंदाज उमारन मलिकबाबत (Umran Malik) एक वक्तव्य केले. अकमलच्या मते जर उमरान मलिक पाकिस्तानात (Pakistan) असता तर तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) खेळला असता असे वक्तव्य केले. उमरान मलिकने आयपीएलच्या 15 व्या हंगामात सनाईजर्स हैदराबादकूडन खेळताना आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा: 'मी जर निवडसमितीत असतो तर दिनेश कार्तिक....'
कामरान अकमल हा राजस्थान रॉयल्सकडून 2008 च्या पहिल्याच आयपीएल हंगामात खेळला होता. त्यावेळी राजस्थानने विजेतेपद पटकावले होते. कामरान अकमलच्या मते अजून मलिकची इकॉनॉमी जास्त आहे मात्र तो आपल्या संघाला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देत आहे. कमारान अकमलने भारताने गेल्या काही वर्षात वेगवान गोलंदाजीत चांगले पर्याय निर्माण केले आहेत. या क्षेत्रात चांगले काम झाले आहे असे म्हणत भारतीय क्रिकेटची स्तुती केली.
हेही वाचा: शोएब अख्तरने CSK च्या टीम मॅनेजमेंटला फटकारले
पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कामरान अकमल उमरान मलिकबद्दल बोलला. तो म्हणाला की, 'जर तो पाकिस्तानात असता तर आतापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता. त्याची इकॉनॉमी जास्त असली तरी तो एक स्ट्राईक बॉलर आहे. तो विकेट घेतो. प्रत्येक सामन्यात त्याचा वेग 155 किमी प्रती तासापेक्षा जास्त असतो. हा वेग सामन्यागणिक वाढत चालला आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे ही एक चांगली बाब आहे.'
कामरान पुढे म्हणाला की, 'आधी भारताकडे दर्जेदार वेगावान गोलंदाजांची कमतरता होती. मात्र आता त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांचा एक समूहच तयार झाला आहे. यात नवदीप सैनी, सिराज, शमी, जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. उमेश यादव देखील चांगली गोलंदाजी करत आहे. एकाचवेळी 10 ते 12 वेगवान गोलंदाज असण्याने भारतीय निवडसमितीला टीम निवडताना खूप अडचणी येतात.'
Web Title: Kamran Akmal Says If Umran Malik Was In Pakistan He May Already Playing International Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..