
'मी जर निवडसमितीत असतो तर दिनेश कार्तिक....'
मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) दिनेश कार्तिकबद्दल (Dinesh Karthik) एक मोठे वक्तव्य केले. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) भारतीय संघनिवडीबाबत (Team India Selection) आयपीएलपासूनच (IPL 2022) सुरूवात झाली आहे. हरभजनच्या मते आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकने स्वतःला एक उत्तम फिनिशरच्या (Finisher) रूपात सादर केले आहे. त्याने 12 सामन्यात 68.50 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 274 धावा केल्या आहेत.
हेही वाचा: शोएब अख्तरने CSK च्या टीम मॅनेजमेंटला फटकारले
या वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळावे म्हणून दिनशे कार्तिक खूप मेहनत घेत आहे. दिनेश कार्तिकच्या या मेहनतीबाबत हरभजनने मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, 'दिनेश कार्तिक आरसीबीचा एक जबरदस्त खेळाडू आहे. तो त्याच्या ऑफ साईडच्या तुलनेत लेग साईडला खूप चांगले फटके मारतो. मला असे वाटते की तो आपला खेळ चांगल्या पद्धतीने ओळखतो.'
हरभजन पुढे म्हणाला की, 'माझ्यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात चांगली फिनिशरची भुमिका कोणी निभावली असेल तर ती दिनेश कार्तिकने निभावली आहे. जर मी निवड समितीत असतो तर मी त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी नक्कीच संघात स्थान दिले असते. भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्याचा तो लायक आहे.'
हेही वाचा: VIDEO : सीएसकेला ट्रोल करणाऱ्या युवराजला रैनाने दिले भन्नाट उत्तर
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात फिनिशर म्हणून कोणाला तुमची पसंती आहे असे हरभजनला विचारल्यावर त्याने, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक फिनिशरची भुमिका बजावण्यासाठी योग्य जोडी असू शकते. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी देखील आरसीबीच्या एका कार्यक्रमादरम्यान कार्तिक संघासाठी फिनिशरच्या भुमिकेबरोबरच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचेही काम करत आहे असे सांगितले होते.
Web Title: Harbhajan Singh Statement About Dinesh Karthik Selection In Upcoming T20 World Cup In Australia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..