इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. लिलावानंतर संघांची कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता होती. लिलावात चेन्नईच्या चुकलेल्या डावपेचांचा फटका बसलेला दिसला. पण, RR व SRH यांनी चांगले खेळाडू निवडले होते. त्यासाठी तगडी रक्कमही मोजली होती. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघात एकासएक सरस खेळाडू आहेत. तरी त्यांची ही अवस्था झाली.