Kieron Pollard Smashes Sixes in MI Nets मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मुंबईचा संघ ६ सामन्यांत २ विजय व ४ पराभवासह तालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने यापूर्वी अनेकदा अशा परिस्थितीतून पुरागमन केले आहे, परंतु त्यावेळी त्यांच्याकडे तगड्या खेळाडूंची फौज होती. आज तिलक वर्मा व सूर्यकुमार यादवचं सातत्य सोडलं तर मुंबईच्या फलंदाजांना प्रभाव पाडता आलेला नाही.