
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करायचा आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने KKR चा संघ ईडन गार्डवर उतरेल. त्यासाठी खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आणि काल त्यांची फटकेबाजी पाहून प्रतिस्पर्धी संघाला धडकी नक्की भरली असेल. १५ मार्च रोजी झालेल्या इंट्रा स्क्वाड मॅचमध्ये आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांचा तुफानी फॉर्म पाहायला मिळाला.