रेल्वेत 'क' श्रेणी नोकरी करणाऱ्या इंजिनियरसाठी कसं उघडलं IPLचं दार?

KKR Pratham Singh Journey
KKR Pratham Singh JourneyESAKAL

KKR IPL 2022 Pratham Singh | कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या आयपीएल हंगामात जरी फारशी चमकदार कामगिरी करू शलेली नाही. असे असले तरी त्यांनी 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात काही युवा खेळाडूंना हेरून त्यांना आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. याच केकेआरच्या संघात एक रेल्वेमध्ये क श्रेणीत नोकरी करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनिअर (Electronics and Communication Engineer) देखील आहे. या इंजिनिअरचं नाव आहे प्रथम सिंह. 29 वर्षाचा हा दिल्लीचा युवा सलामीवीर केकेआरकडून (Kolkata Knight Riders) आपल्या पदार्पणाच्या संधीची वाट पाहत आहे. तर या इंजिनिअर असलेल्या प्रथमच्या इंजिनिअर ते आयपीएल हा प्रवास कसा झाला हे पाहूया

KKR Pratham Singh Journey
शुभमंगल सावधान! माजी क्रिकेटपटू अरुण लाल अडकले लग्नबंधनात

प्रथम सिंहचा इंजिनिअर ते क्रिकेटर प्रवास

  • - प्रथम सिंहचा जन्म 31 ऑगस्ट 1992 साली झाला. तो सध्या 29 वर्षाचा आहे.

  • - प्रथम सिंह हा रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने 2017 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले.

  • - प्रथम सिंह हा रेल्वेमध्ये क श्रेणी कर्मचारी आहे. त्याने ही नोकरी आपली इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर मिळवली होती.

  • - देशांतर्गत मर्यादित षटकांच्या प्रथम श्रेणी स्पर्धेत 2019 ला पदार्पण केले. तेव्हापासून तो रेल्वेकडून सर्वाधिक धावा करतोय. त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत पदार्पणाच्या वर्षातच सलग चार अर्धशतके ठोकली होती.

  • - प्रथम सिंहसाठी पहिल्यांदा आयपीएलचे दार 2017 मध्ये उघडले होते. तो त्यावेळी गुजरात लायन्सच्या संघात सामील झाला होता. त्याची ही निवड त्याने विजय हजारे आणि सईद मुश्ताक अली ट्रॉफीत एकाच वर्षात पदार्पण केल्यानंतर झाली होती.

  • - सिंहला 2022 च्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याची बेस प्राईस 20 लाखाला खरेदी केले .

  • - डावखुरा आक्रमक शैलीचा सलामीवीर असलेला प्रथम हा कोरोना काळात ज्यावेळी देशांतर्गत क्रिकेट बंद होते त्यावेळी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्येही त्याने प्रवेश मिळवला होता. मात्र त्याने नंतर त्याने आपली खेळाची आवड जोपासणे पसंत केले.

  • - प्रथमने सईद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 2020 - 21 च्या हंगामात 74.75 च्या सरासरीने 299 धावा केल्या होत्या. त्यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या खेळीमुळेच केकेआरच्या नजरेत तो भरला. त्यानंतर केकेआरने लिलावात त्याला आपल्या गोटात सामील करून घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com