BCCI ने IPL 2024 च्या शेड्यूलमध्ये अचानक केला मोठा बदल! जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

IPL 2024 Matches Rescheduled : यंदा पण आयपीएल 2024 चा थरार भारतात अतिशय भव्य पद्धतीने खेळवला जात आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.
IPL 2024 Matches Rescheduled News Marathi
IPL 2024 Matches Rescheduled News Marathisakal

IPL 2024 Matches Rescheduled : यंदा पण आयपीएल 2024 चा थरार भारतात अतिशय भव्य पद्धतीने खेळवला जात आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आधी बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते.

IPL 2024 Matches Rescheduled News Marathi
Virat Kohli: 'गेलपेक्षाही विराट भारी...', T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाबद्दल बोलताना दिग्गज ऑलराऊंडरचं मोठं भाष्य

त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. पण बीसीसीआयने आता आयपीएल 2024 च्या मधल्या वेळापत्रकात बदल केला आहे. दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

IPL 2024 Matches Rescheduled News Marathi
World Cup 2011 Final: सचिनने आऊट झाल्यानंतर मैदानात जाणाऱ्या 22 वर्षांच्या विराटला नक्की काय सांगितलं होतं?

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 17 एप्रिल 2024 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, परंतु आता हा सामना 16 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

याशिवाय गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 16 एप्रिल 2024 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, जो आता 17 एप्रिल रोजी खेळवला जाईल. या दोन सामन्यांमध्येच बदल झाले आहेत.

IPL 2024 Matches Rescheduled News Marathi
BAN vs SL: बांगलादेशी फिल्डर्सचं चाललंय काय! आधी एक कॅच तिघांनी सोडला अन् आता एका बॉलच्या मागं पाचजण धावले, Video Viral

आयपीएल 2024 मध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. यावेळी अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये क्वालिफायर सामने खेळवले जातील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाईल.

तर 22 मे रोजी एलिमिनेटर सामना याच मैदानावर होणार आहे. तर दुसरा क्वालिफायर 24 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. 26 मे रोजी चेन्नईच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com