Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

Shreyas Iyer
kkr ipl 2024 Winner esakal

Shreyas Iyer KKR Win IPL 2024 : आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्स राखून पारभव करत तब्बल 10 वर्षांनी आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने हैदराबादला आधी 113 धावात गुंडाळलं. त्यानंतर हेच आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 11व्या षटकात पार केलं.

श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने यंदाच्या हंगामात गुणतालिकेत 20 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं होतं. ते पहिल्यापासूनच संभाव्य विजेते होते. दरम्यान, आयपीएलपूर्वी अय्यरच्या कारकिर्दीत फार चांगल्या गोष्टी घडत नव्हत्या.

त्याला बीसीसीआयचे सेंट्रल काँट्रॅक्ट गमवाव लागलं होतं. दुखापतीमुळं तो त्रस्त होता. गेला आयपीएल हंगाम अन् अनेक महिने को क्रिकेटपासून दूर होता. त्यात टी 20 वर्ल्डकप संघातील स्थान देखील त्यानं गमावलं. मात्र आता त्यानं आयपीएल जिंकून दाखवत बीसीसीआयला एक प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं.

Shreyas Iyer
KKR vs SRH : कॅप्टन कमिन्स ठरला व्हिलन? तगडी फलंदाजी तरी हैदराबादचा IPL Final मध्ये लाजिरवाणा विक्रम

केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरचे देखील या संघाला मार्गदर्शन लाभले. गंभीरच्या योजानांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी श्रेयस अय्यरने केली. त्यांनी फिअरलेस क्रिकेट खेळले. पॉवर प्लेमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून केकेआरनं नाव कमावलं. केकेआरच्या विजयाचं श्रेय सांघिक कामगिरीला जातं.

मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. केकेआरच्या विजयाचे श्रेय मेंटॉर गौतम गंभीरला जातं की कर्णधार श्रेयस अय्यरला! गंभीर श्रेयसचं श्रेय लाटत तर नाही ना अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

एका युजरने तर एक्सवर गंभीर अन् श्रेयसच्या आकडेवारीद्वारे तुलना केली आहे. एक्सवरील संजय नावाच्या एका अकाऊटंवरून दिलेल्या माहितीनुसार गौतम गभारने आयपीएलमध्ये 9 हंगामात कॅप्टन्सी केली आहे. त्यातील 4 हंगामात तो संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन गेला. त्यातील 2 हंगामात संघानं विजेतेपदाला गवसणी घातली.

दुसरीकडं श्रेयस अय्यरने 4 हंगामात आयपीएल संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यातील तीन हंगामात संघाला प्ले ऑफमध्ये नेलं. त्यातील दोन हंगामात संघ अंतिम सामन्यात पोहचला. या आकडेवारीवरून अय्यरचं महत्व देखील तितकंच असल्यांच नेटकरी म्हणत आहेत.

Shreyas Iyer
Mitchell Starc : सब्र का फल मिठा! 24 कोटीचा स्टार्क ठरला नॉक आऊट स्टार

सोशल मीडियावर जरी केकेआरच्या विजयाचा श्रेयवाद रंगला असला तरी गौतम गंभीर हा टीम मॅन असून तो एखाद्या मोठ्या विजयाला एक व्यक्ती किंवा एक खेळाडू जबाबदार नसतो तर संपूर्ण संघाचं ते यश असतं अस मानतो.

याचबरोबर केकेआरच्या विजयातील चंद्रकांत पंडित यांचं योगदान देखील विसरून चारणार नाही. कडक शिस्तीच्या चंदू पंडितांना देशांतर्गत क्रिकेटधला दांडगा अनुभव असून केकेआरच्या परदेशी खेळाडूंप्रमाणेच स्थानिक खेळाडू देखील चमकले आहेत. यंदा हर्षित राणा आणि वैभव अरोराने दमदार कामगिरी केली.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com