KL Rahul LSG Captaincy : केएल राहुल त्वरित सोडणार लखनौची कॅप्टन्सी? LSG मध्ये जोरदार हालचाली

KL Rahul
KL Rahul Likely To step down on his own as Lucknow Super Giants Captain IPL 2024esakal

KL Rahul Likely To step down on his own as Lucknow Super Giants Captain IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सचा सनराईजर्स हैदराबादने दारूण पराभव केल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका हे केएल राहुलवर जाम भडकल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर केएल राहुल आता संघाचं नेतृत्व सोडणार का अशी चर्चा सुरू होती.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल याच हंगामात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व सोडण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी मेगा लिलाव असल्यानं केएल राहुल उरलेल्या दोन सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळू शकतो.

KL Rahul
Sanjiv Goenka: आठ वर्षांपूर्वी धोनीबरोबर संजीव गोयंकांनी जे केलं, तेच केएल राहुलसोबतही होणार?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, लखनौने केएल राहुलला 2022 मध्ये 17 कोटी रूपये देऊन आपल्या संघात घेतलं होते. त्यानंतर तो संघाचा कर्णधार देखील झाला होता. मात्र 2025 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्स केएल राहुलला रिटेन करण्याची शक्यता फार कमी आहे.

सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात लखनौचे टार्गेट 9.4 षटकातच पार करण्यात आलं. त्यानंतर संघ मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात मैदानातच खडाजंगी झाली होती. त्यानंतर क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

आता आयपीएलमधील एका सूत्राने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'लखनौ आणि दिल्लीच्या सामन्यात आता पाच दिवसांचा गॅप आहे. सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र केएल राहुल हा उर्वरित दोन सामन्यासाठी आता फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणार आहे. याला संघ व्यवस्थापनाचा कोणताही आक्षेप नाहीये.'

KL Rahul
Who is Sanjiv Goenka: केएल राहुलला झापणारे, धोनीला कर्णधारपदावरून हटवणारे; कोण आहेत संजीव गोयंका?

संजीव गोयंका हे राईजिंग पुणे सुपर जायंट्सचे देखील मालक होते. त्यावेळी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता महेंद्रसिंह धोनीला कॅप्टन्सीवरून काढून टाकलं होतं. त्यांनी दुसऱ्या हंगामात स्टीव्ह स्मिथला कर्णधार केलं होतं.

लखनौ सुपर जायंट्सचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न अजून अबाधित आहे. त्यांनी जर 16 गुण मिळवले तर ते प्ले ऑफ खेळतील. यासाठी त्यांना आपले दोन्ही सामने जिंकावे लागतील. ते दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरूद्ध खेळणार आहेत. दिल्लीविरूद्धचा सामना 14 मे आणि मुंबई विरूद्धचा सामना 17 मे रोजी होणार आहे.

जर केएल राहुलने कर्णधारपद सोडलं तर उपकर्णधार निकोलस पूरन हा संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्यानं यंदाच्या हंगामात फ्रेंचायजीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com