Sanjiv Goenka: आठ वर्षांपूर्वी धोनीबरोबर संजीव गोयंकांनी जे केलं, तेच केएल राहुलसोबतही होणार?

KL Rahul: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे संघमालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर भडकले असल्याचे दिसले होते.
Sanjiv Gaenka | MS Dhoni | KL Rahul
Sanjiv Gaenka | MS Dhoni | KL RahulSakal

Sanjiv Goenka - KL Rahul News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादचा हा विजय विक्रमी ठरला.

या सामन्यात लखनौने हैदराबादसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड या दोन सलामीवीरांनी अवघ्या ९.४ षटकात पूर्ण केला. त्यामुळे लखनौला मोठ्या पराभवाला तर सामोरे जावे लागलेच, पण प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्याच्या त्यांच्या संधीलाही मोठा धक्का लागला.

दरम्यान, त्यांच्या या पराभवाबरोबरच संघमालक संजीव गोयंका यांचीही बरीच चर्चा सामन्यानंतर झाली. झाले असे की सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर गोयंका लखनौचा कर्णधार केएल राहुलबरोबर बोलताना दिसले होते. त्यांच्या चर्चेदरम्यानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यावरून तरी ते त्याला पराभवाबद्दल जाब विचारत असल्याचा कयास लावण्यात येत आहे.

Sanjiv Gaenka | MS Dhoni | KL Rahul
Hardik Pandya : हंगामातील खराब कामगिरीनंतर हार्दिकबाबत MI मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय? कामकाजावर सिनियर खेळाडूंचीही नाराजी

दरम्यान, गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील चर्चेचे व्हिज्युएल्स समोर आल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यावर टीका करताना म्हटले की अशा चर्चा बंद दारामागे व्हायला हव्यात, सर्वांसमक्ष नाही.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने जिओ सिनेमाशी बोलताना म्हटले की 'त्यांनी त्यांच्या संघाचा लाजीरवाणा पराभव झालेला पाहिलाय आणि तुम्हाला माहित आहे की अशावेळी भावना उफाळून येतात. पण अशाप्रकारच्या चर्चा या बंद दारामागे व्हायला हव्या.'

'कारण स्टेडियममध्ये भरपूर कॅमेरे असतात. त्यांच्यापासून काहीही लपत नाही. केएल राहुल आता पत्रकार परिषदेसाठी जाईल, त्याला कदाचीत या चर्चा झाली, याबद्दलबी स्पष्टीकरण द्यायला लागेल.'

संजीव गोयंका यांनी 2022 मध्ये 7,090 कोटी रुपये मोजत लखनौ संघाचा मालकी हक्क मिळवला होता. त्यानंतर त्यांनी केएल राहुलला संघात घेत त्याच्याकडे नेतृत्वाची धूराही सोपवली होती. त्यानंतर 2022 आणि 2023 मध्ये लखनौ संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते, पण त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

Sanjiv Gaenka | MS Dhoni | KL Rahul
Who is Sanjiv Goenka: केएल राहुलला झापणारे, धोनीशी पंगा घेणारे; कोण आहेत संजीव गोयंका?

तसेच सध्या आयपीएल 2024 मध्ये लखनौ संघ 12 सामन्यांपैकी 6 विजय आणि 6 पराभवांसह 12 गुण मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

इतकेच नाही, तर केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असूनही त्याला टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.

अशात आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की लखनौ केएल राहुलला पुढीलवर्षासाठी संघात कायम ठेवणार की नाही. कारण आयपीएल 2025 चा मेगा लिलाव होणार आहे. अशात केएल राहुलला नेतृत्वावरून काढण्यात येऊ शकते किंवा त्याला लखनौ संघ करारमुक्तही करू शकतात.

दरम्यान, यापूर्वी संजीव गोयंका अशाच कारणामुळे चर्चेत आले होते, त्यांनी 2017 आयपीएलदरम्यान एमएस धोनीला रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून काढले होते.

Sanjiv Gaenka | MS Dhoni | KL Rahul
England Cricket: इकडं आयपीएल चालू असतानाच भारताचा 'हा' वेगवान गोलंदाज इंग्लंडमध्ये उतरणार मैदानात

2016 आणि 2017 या दोन हंगामांसाठी पुणे सुपर जायंट्स संघ आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. या संघाचा मालकी हक्कही संजीव गोयंका यांच्याकडे होता. त्यावेळी 2016 मध्ये पुणे सुपर जायंट्स संघाला धोनीच्या नेतृत्वात प्लेऑफमध्ये पोहचण्यास अपयश आले होते.

त्यानंतर 2017 आयपीएलपूर्वी धोनीला नेतृत्वपदावरून हटवत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली होती. त्यावेळीही संजीव गोयंका यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

मात्र या टीकेला त्यांनी उत्तर देताना म्हटले होते की 'मी प्रत्येक मताचा आदर राखतो, पण हा काही सार्वजनिक वादविवादाचा विषय नाही. कधीकधी लोकांना रुचेल, असेच निर्णय घेण्याची गरज नसते.' तसेच त्यांनी असेही म्हटले होते की त्यांना युवा कर्णधाराची गरज आहे.

एकूणच गोयंका यांचा तो निर्णय पाहाता, केएल राहुललाही अशा प्रकारच्या निर्णयांना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता सध्या व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com