esakal | IPL 2021: "माझी ऑरेंज कॅप घ्या पण..."; हताश के एल राहुलचे उद्गार | KL Rahul
sakal

बोलून बातमी शोधा

KL-Rahul-Orange-Cap

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव

"माझी ऑरेंज कॅप घ्या पण..."; हताश के एल राहुलचे उद्गार

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs PBKS: बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाब संघाला अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. RCB च्या संघाने २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक (५७) आणि देवदत्त पडीकलच्या ४० धावांच्या जोरावर बंगळुरूने मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक-राहुल जोडीने नेहमीप्रमाणे दमदार सुरूवात केली. पण शेवटच्या टप्प्यात पंजाबला आव्हानाचा पाठलाग करण्यास अपयश आलं. बंगळुरूकडून पराभूत झाल्यानंतर राहुलला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने हताश होत एक भावनिक उत्तर दिलं.

सामना संपल्यानंतर मुलाखत घेणारे इयन बिशर यांनी राहुलला विचारलं की तुला ऑरेंज कॅप मिळाली आहे. तुझ्या धावा सर्वाधिक आहेत. पण तुझा संघ पराभूत झालाय. असे असताना तू संघाला दोन पॉईंट मिळावे यासाठी ऑरेंज कॅप दुसऱ्या कोणाला तरी परत देशील का? त्यावर राहुल म्हणाला, "ऑरेंज कॅप परिधान करायला मला आवडत नाही असं मी म्हणणार नाही. पण माझ्या संघाला दोन गुण मिळणार असतील तर मी कोणत्याही दिवशी माझी ऑरेंज कॅप परत द्यायला तयार आहे. कारण, आमचा संघ जिंकत नसेल तर माझ्या डोक्यावरील ऑरेंज कॅपचा उपयोगच नाही असं मला वाटतं. जर माझा संघ जिंकला असता आणि आम्ही क्वालिफाय झालो असतो तर मला त्या गोष्टीचा जास्त आनंद झाला असता. आमच्या संघाकडून बंगळुरूला १०-१५ धावा जास्त दिल्या गेल्या. त्याचा आम्हाला फटका बसला. पण, मॅक्सवेल ज्या लयीत खेळत होता ते पाहता कितीही धावा केल्या असत्या तरी कमीच ठरल्या असत्या."

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण-कोण?

  1. लोकेश राहुल - ५२८ (१२ सामने)

  2. ऋतुराज गायकवाड - ५०८ (१२ सामने)

  3. संजू सॅमसन - ४८० (१२ सामने)

  4. शिखर धवन - ४६२ (१२ सामने)

  5. फाफ डू प्लेसिस - ४६० (१२ सामने)

loading image
go to top