LSG vs CSK : लखनौने सीएसकेला दिला पराभवचा धक्का; 8 विकेट्सनी जिंकला सामना

LSG vs CSK Cricket Score IPL 2024 News Marathi
LSG vs CSK Cricket Score IPL 2024 News Marathisakal

Lucknow Super Giant Defeat Chennai Super Kings IPL 2024 : केएलची कॅप्टन्स इनिंग, धोनीनं मन जिंकलं

केएल राहुलच्या अर्धशतकानंतर क्विंटडन डिकॉकने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आपली शतकी भागीदारी 14 षटकात 123 धावांपर्यंत वाढवली. या विजयासोबतच लखनौचे 8 गुण झाले आहेत. ते कमी नेट रनरेटमुळे गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. सीएसकेकडून मुस्तफिजूर आणि पथिराना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लखनौ सुपर जायंट्सने चांगली सुरूवात करणाऱ्या चेन्नईची अवस्था 5 बाद 90 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजा (57 धावा), मोईन अली (30 धावा) अन् महेंद्रसिंह धोनी (9 चेंडूत नाबाद 28 धावा) यांनी दमदार फलंदाजी करत चेन्नईला 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत पोहचवलं. सलामीवीर अजिंक्य रहाणेने देखील 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. लखनौकडून क्रुणाल पांड्याने 2 विकेट्स तर यश ठाकूर, मोहसीन खान, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

LSG vs CSK : लखनौने सीएसकेला दिला पराभवचा धक्का; 8 विकेट्सनी जिंकला सामना

लखनौ सुपर जायंट्सने सीएसकेचे 177 धावांचे आव्हान 19 षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. केएल राहुलने 82 तर डिकॉकने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

केएल राहुलच्या 82 धावांची खेळी, लखनौ विजयाच्या जवळ 

केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्याने लखनौ सुपर जायंट्सला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. निकोलस पूरनने देखील आक्रमक फलंदाजी करत सामना 12 चेंडूत 12 धावा असा आणला.

केएल पाठोपाठ डिकॉकचेही अर्धशतक 

केएल राहुलच्या अर्धशतकानंतर क्विंटडन डिकॉकने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आपली शतकी भागीदारी 14 षटकात 123 धावांपर्यंत वाढवली.

LSG vs CSK Live Cricket Score : लखनौच्या सलामीवीरांचाच जलवा; शतकी सलामी देत सीएसकेचे टेन्शन वाढवलं

चेन्नई सुपर किंग्जच्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. त्यांनी 13 षटकात 113 धावा करत चेन्नईचे टेन्शन वाढवले.

LSG vs CSK Live Cricket Score : धोनीचा तडाख्यात सापडली लखनौ, जडेजाचे अर्धशतक झाकोळलं

चेन्नईच्या 141 धावा झाल्या असताना धोनी क्रीजवर आला. त्यानं 9 चेंडूत 28 धावा ठोकून संघाला 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत पोहचवले. रविंद्र जडेजाने 40 चेंडूत 57 धावा केल्या. मोईनने 20 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले.

LSG vs CSK Live Cricket Score : चेन्नईला धोनीची साथ; मोहसीन खानला दिले तडाखे

मोईन अलीने सलग तीन षटकार मारत चेन्नईला 150 च्या जवळ पोहचवले. त्यानंतर बिश्नोईने त्याला बाद केलं. मोईन बाद झाल्यानंतर धोनी क्रीजवर आला अन् त्यानं मोहसीन खानला चौकार अन् षटकार मारत धडाक्यात सुरूवात केली.

LSG vs CSK Live Cricket Score : चेन्नईचा निम्मा संघ गारद; जडेजा देतोय एकाकी झुंज

अजिंक्य रहाणे चेन्नईला चांगली सुरूवात करून दिल्यानंतर मधल्या षटकात चेन्नईची मधली फळी ढेपाळली. यश ठाकूर आणि क्रुणाल पांड्याने भेदक मारा करत चेन्नईची अवस्था 5 बाद 90 धावा अशी केली. त्यानंतर जडेजा आणि मोईन अलीने डाव सावरला. या दोघांनी संघाला 16 षटकात 113 धावांपर्यंत पोहचवलं.

LSG vs CSK Live Cricket Score : सीएसकेला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के; मात्र अजिंक्य रहाणेची आक्रमक फलंदाजी

लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. मोहसीन खानने रचिन रविंद्रला शुन्यावर तर यश ठाकूरने ऋतुराजला 17 धावांवर बाद केलं. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणेने आक्रमक फलंदाजी करत संघाला 5 षटकात 42 धावांपर्यंत पोहचवलं.

चेन्नईच्या संघात दोन बदल 

ऋतुराज गायकवाडने आपल्या संघात दोन बदल केले असून डॅरेल मिचेलच्या ऐवजी संघात मोईन अलीचा समावेश करण्यात आला आहे. तर शार्दुल ठाकूरच्या जागेवर दीपक चाहर संघात आला आहे.

लखनौने संघात एकच बदल केला असून जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला संधी मिळाली आहे.

LSG vs CSK Live Cricket Score : लखनौने नाणेफेक जिंकली;

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इकाना स्टेडियमवर लखनौचे टार्गेट डिफेंड करण्यात चांगले रेकॉर्ड आहे. मात्र चेन्नईविरूद्ध त्यांनी टार्गेट चेस करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com